ओठांवर तीळ असणारे फारच लकी; तर गालावर तीळ असणारे...; तीळ सांगतात स्वभाव वैशिष्ट्ये

Swapnil Ghangale
Jan 02,2024

तीळ बरंच काही सांगतो

असं म्हणतात की शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर असलेल्या तिळांना वेगवेगळं महत्त्व असतं.

चेहऱ्यावरील तीळ काय सूचित करतात...

सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीरावरील तिळाबद्दल बरंच काही सांगण्यात आलं आहे. याच शास्त्रानुसार कोणता तीळ काय सूचित करतो पाहूयात...

कपाळावर तीळ असेल तर...

कपाळावर तीळ असणं हे सौभाग्यवान असल्याचं लक्षण मानलं जातं.

कपाळावर तीळ असलेले लोक

सामुद्रिक शास्त्रानुसार कपाळावर तीळ असलेले लोक फार श्रीमंत असतात किंवा होतात.

नाकावर तीळ असेल तर चांगले संकेत कारण...

नाकावर तीळ असलेल्या लोकांच्या आयुष्यात सुख आणि संपत्ती मोठ्या प्रमाणात असते.

नाकावर तीळ असलेल्यांनी कितीही मेहनत केली तरी...

मात्र नाकावर तीळ असलेल्या व्यक्तींपैकी अनेकांनी कितीही मेहनत केली तरी त्यांना यश येत नाही असंही होतं.

ओठांच्या वरील बाजूला तीळ असेल तर...

ओठांच्या वरील बाजूस तीळ असलेले लोकं फार गप्पा मारतात. लोकांना आपल्याकडे आर्षित करण्याची कला त्यांच्याकडे असते.

वाईट नजरेपासून वाचवतो

गालावर तीळ असलेल्यांना हा तीळ वाईट नजरेपासून वाचवतो असं म्हणतात.

गालावर तीळ असेल तर...

सामुद्रिक शास्त्रानुसार गालावर तीळ असलेल्यांना फार मेहनत घ्यावी लागते. मात्र हे लोक भाग्यशाली असतात.

लाल तीळ धोकादायक

चेहऱ्यावर असलेला तीळ लाल रंगाचा असेल तर अशा व्यक्तींचं वैवाहिक आयुष्य फारसं समाधानी नसतं.

नाकाच्या खालच्या भागात तीळ असेल तर

नाकाच्या खालील भागात तीळ असेल तर हे लोक इतरांशी फारसं बोलत नाहीत. अशा लोकांना इतर लोकांबरोबर मिसळायला आवडत नाही.

ओठांजवळ तीळ असेल तर...

ओठांवर किंवा ओठांजवळ तीळ असेल तर अशी लोक फार हुशार असल्याचं मानलं जातं.

ओठांवर तीळ असेल तर..

ओठांवर तीळ असलेल्या व्यक्तींमध्ये कामुक इच्छा फार तीव्र असतात.

ओठांवर तीळ असलेल्या व्यक्ती...

ओठांजवळ किंवा ओठांवर तीळ असलेल्या व्यक्ती फार मुक्त विचारांच्या असतात असंही म्हटलं जातं.

सामान्य संदर्भांवरून

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story