25, 30 की 35 आई होण्याचं योग्य वय कोणते? जाणून घ्या
Pooja Pawar
Sep 22,2024
शिक्षण, करिअर, जोडीदाराकडून वाढत्या अपेक्षा इत्यादी अनेक कारणांमुळे आजकाल मुलं-मुली उशिरा लग्न करतात.
लग्न झाल्यावरही जबाबदाऱ्या करिअर इत्यादी कारणामुळे मुलं होण्याचा निर्णय लांबणीवर टाकला जातो. परंतु बराच उशीर झाला तर गर्भधारणेत अनेक अडचणी येऊ शकतात.
तेव्हा आई वडील होण्याचं योग्य वय नेमकं काय हा डॉक्टरांना सर्वाधिक विचारला जाणाऱ्या प्रश्नांपैकी एक आहे.
अनेकदा पुरूषांना वाटतं की, मुलं होण्यासाठी त्यांच वय महत्वाचं नाही. बायोलॉजिकल क्लॉक हे फक्त स्त्रियांसाठीच महत्वाचं आहे. मात्र हा विचार चुकीचाय.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार वडील होण्याचं योग्य वय हे 20 ते 30 वर्ष असतं. वयाच्या तिशीनंतर पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी होत जाते.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार महिलांसाठी 21 ते 30 हे वय आई होण्यासाठी योग्य आहे. 30 वर्षांनंतर महिलांना गरोदरपणात अडचणी येऊ शकतात.
अनेक महिला 35 वर्षांनंतरही आई होण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु अशा परिस्थितीत मुलांमध्ये अॅबनॉर्मल आनुवंशिक गुण येऊ शकतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
35 ते 40 वर्षानंतर महिलांची प्रजनन क्षमता कमी होऊ लागते.
महिलांसाठी लहान वयात आई होणं सुद्धा खूप धोकादायक ठरतं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)