सकाळचा नाश्ता हा दिवसातील खाल्ले जाणारे सर्वात पहिले भोजन मानले जाते. शरीराला काम करण्यासाठी पुरेशी ऊर्जा ही सकाळच्या नाश्त्यात सेवन केलेल्या पदार्थांतूनच मिळते.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार जर तुम्ही नाश्ता हा सकाळी 9 च्या पूर्वी केल्यास शरीराला त्याचे अनेक फायदे मिळू शकतात.
सकाळी 7 ते 9 ही नाश्ता करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ आहे.
सकाळी नाश्ता केल्याने मेटाबॉलिज्मचा वेग वाढतो. यामुळे कॅलरीज लवकर बर्न होतात आणि वजन नियंत्रणात राहते.
सकाळी योग्य वेळी नाश्त्यात सकस आहार घेतल्याने मेंदूला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात, ज्यामुळे मेंदू अधिक चांगल्या प्रकारे काम करतो.
सकाळी आपली पचनसंस्था ही सक्रिय होण्यास तयार असते. अशावेळी नाश्ता केल्याने पचनक्रिया सुरळीत चालते आणि अन्न सहज पचते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)