31 डिसेंबरमध्ये वर्षे बदलण्यासोबत यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआयचे नियम बदलणार आहेत.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने यूपीआय 123 पेच्या व्यवहाराची मर्यादा वाढवली आहे.
आतापर्यंत या माध्यमातून 5 हजारपर्यंत व्यवहार करता येत होता.
पण आता तुम्हाला याद्वारे 10 हजारपर्यंत व्यवहार करता येऊ शकतो.
यूपीआय 123 पे फिचर हे फोन पे वर मिळणारी सुविधा असून जिना इंटरनेटशिवाय काम करते.
यामध्ये आयव्हीआर नंबर, मिस्ड कॉल्स, ओईएम एम्बेडेड अॅप्स आणि साऊंड बेस्ड टेक्नोलॉजी हे पर्याय मिळतात.
नॅशनल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून 1 जानेवारी 2025 पर्यंत हा नियम लागू केला जाऊ शकतो.
यूजर्सच्या सुरक्षेसाठी यात ओटीपी फिचर्सदेखील आणला जाऊ शकतो.
यूपीआय एक बॅंकींग सिस्टिम असून याद्वारे तात्काळ पैसे ट्रान्स्फर केले जातात.
पण सुरक्षेची योग्य काळजी न घेतल्यास बॅंक अकाऊंट रिकामी व्हायलाही वेळ लागत नाही.