भारतीयांना आवडतो चहा; तर पाकिस्तानात 'या' ड्रिंकची क्रेझ
भारतात चहाप्रेमींची कमतरता नाही. त्यामुळे असंख्य भारतीयांच्या दिवसाची सुरुवातच चहाने होते.
उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा; भारतात प्रत्येक ऋतूमध्ये चहाचा आस्वाद घेतला जातो.
पण आज आपण पाकिस्तानातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या पेय पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत.
डेली टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान सरकारने 24 जानेवारी 2019 रोजी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर एक सर्व्हे केला होता.
यात पाकिस्तानचा राष्ट्रीय पेय पदार्थ कोणता, याबद्दल विचारणा करण्यात आली होती. या सर्व्हेमध्ये 7616 लोकांनी मतं नोंदवली होती.
यातील 81.4 टक्के लोकांनी उसाचा रस पिण्याला पसंती दर्शवली होती.
तर 14.6 टक्के लोकांनी संत्र्याचा रस आवडतो असे सांगितले होते.
तसेच 4 टक्के लोकांनी गाजरचा रस पिणे पसंत असल्याचे सांगितले होते.
या सर्वेक्षणानुसार पाकिस्तानात उसाचा रस पिण्याला पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.