सध्या मुंबईसह सगळीकडेच मान्सून दाखल झाला आहे. पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत एसीमध्ये असलेला ड्राय मोड चालू करून घरातील आर्द्रता दूर करू शकतो. पण जर गाडीतून प्रवास करत असू तेव्हा काय करावे?
आताच्या सर्वच कारमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलची सुविधा मिळते.
जर तुम्ही ऑटोमॅटीक बटन ऑन केले तर कारचा एसी गाडीतील हवामान थंड करते आणि आर्द्रता काढून टाकते.
जर तुमच्या कारमध्ये मॅन्युअल फिचर असतील तर तुम्हाला स्वत:हून बदल करावे लागतील .
गाडीत बसल्यावर कारचा एसी मध्यम ठेवा ज्यामुळे आर्द्रतेपासून सुटका मिळेल आणि गाडीतील हवामान देखील थंड राहण्यास मदत होईल.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तुमच्या कारच्या एसीचे तापमान 24 ते 26 डिग्री दरम्यान ठेवल्यास शरीरासाठी आदर्श मानले जाते.
गाडीतील एसी जास्त ठेवणेसद्धा हानिकारक आहे तर तापमान खूप कमी ठेवल्यास कॉम्प्रेसरवर ताण येऊ शकतो आणि त्यामुळे इंधनाचा वापर वाढेल.