रोजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आहारामुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
बऱ्याच लोकांना शरीरात रक्त कमी किंवा हिमोग्लोबिनची कमी जाणवते. यामुळे अनेक रोग होण्याची भीती वाढते.
जर तुम्हाला सुद्धा शरीरात रक्ताची कमी जाणवत असेल तर या ड्रायफ्रुटचा आहारात नक्की समावेश करा.
रात्रभर 6 ते 7 मनुके पाण्यात भिजवून रोज सकाळी रिकाम्यापोटी त्यांचे सेवन केल्याने शरीरात हिमोग्लोबिन लेवल वाढण्यास मदत होते.
मनुकांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
तसेच मनुकामध्ये मुबलक प्रमाणात लोह आणि अँटिऑक्सिडंट असतात. यामुळे अशक्तपणा दूर राहतो आणि अनेक आरोग्यदायी फायदे देखील होतात.
मात्र, जर तुम्हाला मनुकांचे आहारात सेवन करायचे असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.