अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वं आणि विटामिन असतात. लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी हे घटक अधिक फायद्याचे ठरतात.
आहारतज्ज्ञांच्या मते सहा महिन्यांच्या वयानंतर लहान मुलांना अंड खायला द्यावं. या वयापासूनच त्यांना अधिक पोषक आहाराची गरज भासू लागते.
सुरुवातीला मुलांना उकडलेलं अंडं देऊन त्यांना कोणत्याही घटकाची अॅलर्जी तर नाही, हे पालकांनी जाणून घ्यावं.
मूल एका वर्षाचं झाल्यानंतर त्याला दर दिवशी एक संपूर्ण अंड खाऊ द्यावं. ज्याचा शारीरिक विकासात फायदा होतो.
लहान मुलांना अंड्यातील पिवळा भाग खाऊ देणं अधिक फायद्याचं. यामुळं त्यांची पचनक्रियाही उत्तम राहते.
अंड्यामध्ये असणारा ओमेगा 3 फॅटी अॅसिड हा घटक मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी मदत करतो. यामुळं स्मरणशक्ती उत्तमरित्या काम करते, शिवाय मुलांच्या शरीराला बळकटीसुद्धा मिळते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, आहारतज्ज्ञांचा सल्लाही अवश्य घ्या.)