आयपीएल 2025 चं मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबिया येथील जेद्दाह येथे होणार आहे.

Pooja Pawar
Nov 11,2024


आयपीएल 2025 साठी एकूण 1574 खेळाडूंनी नावं नोंदवली असून सर्व फ्रेंचायझी मिळून फक्त 204 स्लॉट्स शिल्लक आहेत.


आयपीएलच्या मेगा ऑक्शनसाठी नाव नोंदवलेल्या खेळाडूंमध्ये नितीश राणा याचाही समावेश आहे.


30 वर्षांच्या नितीश राणा याने 1.5 कोटींच्या बेस प्राईजवर ऑल राउंडर कॅटेगरीमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे.


नितीश राणा हा नात्याने बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा जावई लागतो. नितीशची पत्नी सांची ही गोविंदाची भाची आहे.


कृष्णा अभिषेकने कपिल शर्मा शोमध्ये सांगितले होते की साची ही तिच्या काकांची मुलगी आहे.


नितीश राणा हा आयपीएल 2024 पर्यंत कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता.


आयपीएल 2023 मध्ये केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर हा दुखापतीमुळे अनुपस्थित असताना नितीश राणाकडे केकेआरच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.


नितीश राणा हा केकेआरचा कर्णधार असताना त्याच्या नेतृत्वात 16 पैकी 6 सामने जिंकले होते.


नितीश राणा याने 107 आयपीएल सामन्यात 2636 धावा केल्या असून यात 10 विकेट्स सुद्धा घेतलेत.


नितीश भारतासाठी टी 20 आणि वनडे सामने सुद्धा खेळलेला आहे. 2015 मध्ये नितीश राणा याचे आयपीएलमध्ये पदार्पण झाले होते. यावेळी त्याची पहिली टीम ही मुंबई इंडियन्स होती.

VIEW ALL

Read Next Story