चीनमधील लोकांच्या फूड पॅटर्न विषयी बरीच चर्चा केली जाते. यातील लोकं विविध प्राण्यांचं मांस खातात.
Statista च्या रिपोर्टनुसार चीन जगातील दुसरं सर्वात मोठं मीट (मांस) मार्केट आहे. तर मांस खाण्याच्या बाबतीत पहिला क्रमांक हा अमेरिकेचा येतो.
चीनमध्ये डुकराचं मांस सर्वात जास्त खाल्लं जातं. तब्बल 55 टक्के डुकराचं मांस येथे खाल्लं जातं.
चीनमध्ये दुसऱ्या क्रमांकावर खाल्लं जाणार मांस कोंबडीचं आहे. चीनमध्ये 27 टक्के लोक चिकन खातात.
चीनमध्ये तिसऱ्या क्रमांकावर लोकं शेळीचं मांस खातात. चिकन, डुक्करनंतर शैलीच मांस चीनमध्ये सर्वाधिक खाल्लं जातं.
चौथा क्रमांकवर येतं गोमांस. चीनमध्ये 12 टक्के लोकं गोमांस खातात.
याशिवाय समुद्राच्या किनारी असलेली लोक माश्यांवरही ताव मारतात. तर काहीजण साप देखील खातात मात्र त्यांची संख्या खूप कमी आहे.