झोपेत सगळ्यांनाच स्वप्न पडतात. पण प्रत्येक स्वप्नामागे काही ना काही अर्थ असतो.
अनेकदा स्वप्न चांगली असतात तर काही स्वप्न भयावह आणि चिंता वाढवणारी असतात.
स्वप्नात कोणाचा मृत्यू पाहतो, अपघात पाहतो किंवा प्रेत दिसतं या स्वप्नामागचा अर्थ काय?
स्वप्नात कुणाचा मृत्यू दिसतो ते शुभ की अशुभ मानले जाते.
स्वप्नात स्वतःला मृत्यू अवस्थेत पाहणे स्वप्न शास्त्रानुसार शुभ मानले जाते.
या स्वप्नानुसार आयुष्यातून मोठे संकट दूर होणार आहे.
स्वप्न शास्त्रानुसार, कुटुंबातील किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू स्वप्नात पाहणे शुभ मानले जाते.
त्या व्यक्तीचे आयुर्मान वाढते तसेच त्याच्यावरील संकट दूर होते. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही.
प्रेतयात्रा दिसणे हे देखील शुभ लक्षण मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार, तुम्ही तुमच्या ध्येयाजवळ आहात.
स्वप्नात प्रेतयात्रा दिसल्यास घाबरु नका ते शुभ मानले जाते.
पहाटेची स्वप्न खरी होतात असं म्हटलं जातं. अशावेळी वरील स्वप्न खरी होतात असं नाही.
तर ती व्यक्ती मोठ्या संकटात पडणार असल्याचीही सूचना असते.
झी 24 तास या बातमीची खातरजमा करत नाही.