आपण उंच असावं असं सगळ्यांनाच वाटतं, कारण उंची जास्त असेल तर आपोआपच आत्मविश्वास वाढतो तसेच व्यक्तिमत्व सुद्धा प्रभावी बनते.
बाल्टिक न्यूज नेटवर्कद्वारे प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार एका अभ्यासातून समोर आलं आहे की 'लातवियाई' या देशातील महिला या इतर देशांच्या तुलनेत सर्वात उंच असतात.
तसेच पुरुषांमध्ये पाहायला गेल्यास डच पुरुष इतर पुरुषांच्या तुलनेत सर्वात उंच असतात.
तसेच युरोपीय लोकांची उंची ही जगातील इतर भागांतील लोकांपेक्षा सरासरीने जास्त असते.
रिपोर्ट्सनुसार लातवियाई महिलांची उंची ही 170 सेमीपर्यंत असते.
लातवियाई शिवाय नेदरलँड आणि एस्टोनिया या देशातील महिलांची उंची देखील इतर देशांच्या महिलांच्या तुलनेत जास्त असते.