रात्रीच्या वेळी काही फळांचे ज्यूस पिणे हानिकारक ठरु शकतात
या फळांचे ज्यूस प्यायल्यामुळं झोपेत बाधा निर्माण होऊ शकते. तसंच, पोटदुखीसारख्या समस्या होऊ शकता.
रिकाम्या पोटी संत्र्यांचा ज्यूस पिऊ नका. त्यामुळं पोटदुखी होऊ शकते. कारण यात अॅसिडची मात्रा अधिक असते
जे रात्री अॅसिटिटी किंवा पोटात जळजळ याचे कारण बनू शकते.
यात साखरेचे प्रमाणदेखील अधिक असते. त्यामुळं शरीरात उर्जा वाढवते
रात्री, गोड ज्यूस जसं की आंबा किंवा डाळिंब यांचे सेवन करु नका
यामुळं रात्रीच्या वेळी पाचनसंस्थेला अधिक काम करावे लागते
यामुळं झोपेत बाधा निर्माण होऊ शकते. त्यामुळं रात्री कमी साखर असलेले ज्यूस प्या
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)