भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) देखील गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.

विदर्भापासून कोकणापर्यंत तापमानवाढ नोंदवली जात आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या मोठी तापमानवाढ पाहायला मिळत असून उन्हाच्या झळांनी नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसत आहे

घामांच्या धारांसह तीव्र उन्हाचा सामना करावा लागत आहे. विदर्भात तर उष्णतेने 45 अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे. अकोल्यात 45.5° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे.

याशिवाय अमरावती 43.2°, वर्धा 43.2°, चंद्रपूर 43.2°, यवतमाळ 43.5°, नागपूर 41.9°, वाशिम 42.0° आणि गडचिरोलीत 43.6° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे.

येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक सूर्यनारायणाचा प्रकोप आणखी वाढत चालला आहे. देशातील अनेक भागात उष्णतेची लाट (Heatwave) पसरली आहे.

दुपारच्या वेळेस कामाशिवाय बाहेर पडू नका असा सल्ला हवामान विभागाने दिलाय. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी दिलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहनही देण्यात आलंय.

उन्हाळ्यात अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते.. यात उष्माघात, जंतुसंसर्ग, डायरिया, कावीळ, टायफॉईड, गोवर, कांजण्या, गलगंड, डोळ्यांचे आजार, त्वचेचे आजार, मुतखडा इत्यादी समस्यांचा समावेश आहे.

VIEW ALL

Read Next Story