हिंदू धर्मानुसार नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नानाची परंपरा आहे. उटणं आणि तेल लावून पहाटे स्नान केले जाते.
थंडीच्या दिवसात अभ्यंगस्नानाचे अनेक फायदे आहेत. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे तेल, उटणं लावून गरम पाण्याने स्नान करणे
अभ्यंगस्नानाच्या आधी शरीराला तेलाने मालिश केले जाते. मात्र, त्यासाठी कोणते तेल वापरणे आरोग्यासाठी चांगले असते हे जाणून घेऊया.
अभ्यंगस्नान करताना आधी शरीराला तेलाने मालिश करणे नंतर तेल शरीरात मुरल्यानंतर त्यावर सुंगधी उटणं लावून स्नान केले जाते.
तेल, हे उष्ण व स्निग्ध गुणाचे असल्याने तेलाच्या अभ्यंगामुळे वात (वायू) दोषाचे शमन होते.
महाराष्ट्रात तिळाचे तेल, केरळात खोबरेल तेल तर उत्तर भारतात मोहरीचे तेल अंगाला लावून अभ्यंग केले जाते.
तिळाचे तेल हे हाडांच्या आरोग्यासाठी आणि त्यांना बळकटी देण्यासाठी उपयुक्त असते.
तेल लावून स्नान केल्याने हिवाळ्यात कोरडी पडत असलेली त्वचा मऊ राहते.
म्हणून दिवाळीत अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे