पूर्वी लोक घड्याळ मनगटाला न बांधता खिशात ठेवायचे.
जेव्हा ऑटोमॅटिक घड्याळांचा काळ होता तेव्हा लोक त्यांना दोन्ही हातात घालत होते.
घड्याळ डाव्या हातात घालण्याची वैज्ञानिक कारणे आहेत.
चावीची घड्याळ उजव्या हातात घातल्यास चावी भरायला लोकांना अडचन येत होती. म्हणून घड्याळ डाव्या हातात घातली जातात.
घड्याळ डाव्या हाताऐवजी उजव्या हातात घातल्यास आकडे उलटे होतात. ज्यामुळे घड्याळ समजनं अवघड जातं.
उजव्या हातानं आपण बरीच कामे करत असतो. त्यामुळे डाव्या हातात घड्याळ घातल्यानं सतत वेळ पाहणं सोपं जातं.
डाव्या हातात घड्याळ सुरक्षित राहतं. ते तुटण्याची शक्यता कमी होते.