भारतात हिवाळा सुरु झाला आहे. देशातील अनेक भागांमध्ये प्रचंड थंडी आहे.
अनेकदा थंडीमुळे अंगात हुडहुडी भरायला सुरुवात होते.
हे असे का होते हे तुम्हाला माहीत आहे का? चला यामागेच कारण जाणून घेऊयात
खरतर आपले शरीराचे सामान्य तापमान 98.6 फॅरेनहाइट म्हणजेच सुमारे 37 अंश असते.
जेव्हा हे तापमान कमी होऊ लागते, तेव्हा शरीर ते वाढवण्यासाठी अनेक पद्धती अवलंबते. यापैकी एक पद्धत हुडहुडी भरणे.
जेव्हा शरीराचे तापमान कमी होऊ लागते तेव्हा तापमान पुन्हा योग्य होण्यासाठी शरीरात हुडहुडी भरते.
हुडहुडीमुळे शरीरात उष्णता निर्माण होऊ लागते आणि जेव्हा शरीर सामान्य तापमानात पोहोचते तेव्हा ते शांत होते.
हुडहुडीसोबतच त्वचाही आकुंचन पावते. यामुळे शरीराच्या आत निर्माण होणारी उष्णता बाहेर पडत नाही.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)