तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की मोठी मंडळी संध्याकाळ झाल्यावर झाडांना हात लावू नका, पानं, फुलं तोडू नका असा सल्ला देतात.
पण यामागचं नेमकं कारण हे बऱ्याच जणांना ठाऊक नसतं.
हिंदू धर्मात झाडांना सजीव मानलं जातं त्यामुळे अशी मान्यता असते की संध्याकाळ झाल्यावर झाडं, रोपं ही विश्राम करतात. अशावेळी त्यांना त्रास दिला जाऊ नये म्हणून संध्याकाळनंतर झाडांना स्पर्श न करण्याचा सल्ला दिला जातो.
आणखीन एक धार्मिक समज असाही आहे की बऱ्याचदा प्राणी, पक्षी, कीटक झाडांवर राहतात. संध्याकाळच्यावेळी ते झाडांवर बांधलेल्या घरट्यांमध्ये विश्रांती घेत असतात. अशावेळी रात्री झाडं हलवली किंवा त्यांची पान तोडली तर पक्षी घाबरू शकतात. म्हणून रात्रीच्या वेळी झाडं आणि वनस्पतींना स्पर्श करू नये.
संध्याकाळ झाल्यावर झाडांची पानं, फुलं तोडू नयेत या मागे काही वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत.
वैज्ञानिक कारणांनुसार रात्रीच्यावेळी झाड कार्बन डायऑक्साइड सोडतात. म्हणून रात्रीच्यावेळी झाडांजवळ झोपणे त्यांची पान तोडणे योग्य नाही असं म्हटलं जातं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)