अनेकांना प्रवासात किंवा एक नेहमीची सवय म्हणून हेडफोन मध्ये गाणी ऐकण्याची सवय असते.
फक्त गाणीच नाही तर आपण सिरीज किंवा चित्रपट देखील तासंतास बघत असतो
पण तुम्हाला माहितेय का सतत हेडफोन कानाला असणं हे धोकादायक आहे.
हेडफोनचा अधिक वापर केल्याने आपलं आपल्याकडेच कमी लक्ष राहतं.
त्यामुळे मान, खांदे आणि मणक्याला ताण येऊ शकतो.
हेडफोन वापरताना काय काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊ.
हेडफोन वापरल्याचा वेळ आणि आवाज मर्यादित ठेवला पाहिजे.
कानांवर ताण येईल एवढा वेळ हेडफोन वापरू नका.
आवाज सहज कमी जास्त करता येईल असे हेडफोन वापरा.
तुमचे हेडफोन स्वच्छ ठेवा आणि ते इतरांसोबत शेअर करणे टाळा.
सार्वजनिक ठिकाणी हेडफोन वापरणं शक्यतो टाळा.
हेडफोन वापरताना आपल्या कानाच्या आणि एकूणच आरोग्याची काळजी घ्या.