रिकाम्या पोटी दूधात मिसळून प्या 'हा' पदार्थ; मिळतील अनेक फायदे

Mansi kshirsagar
Dec 31,2024


जायफळमध्ये अनेक औषधी गुण आहेत. मात्र त्याचे सेवन कसे करावे हे अनेकांना माहिती नसते.


रोज सकाळी जायफळ दूध प्यायल्याने पचनसंस्था सुरळीत होते. तसंच, पोटात गॅस, अॅसिडीटी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्येपासून आराम मिळतो


जायफळ पावडर दुधात टाकून प्यायलास शांत झोप लागते


जायफळात अँटीऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन्स असतात जे रोगप्रतिकार शक्ती वाढवते. तसंच, सर्दी-खोकला आणि अन्य संक्रमणांपासून बचाव करते


रिकाम्या पोटी जायफळ घातलेले दूध प्यायल्यास मेंदू शांत राहतो. स्ट्रेस,डिप्रेशनसारख्या समस्यांवर आराम मिळतो.


जायफळात असलेल्या अँटी बॅक्टेरियल गुण त्वचा हेल्दी आणि चमकदार बनवते.


एक ग्लास कोमट दुधात एक चमचा जायफळ पावडर चांगल्यापद्धतीने मिसळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story