पृथ्वीवरचं एक वर्ष 365 दिवसांचं असतं. मात्र आपल्या सौरमालेतील सर्वच ग्रहांचं असं नाहीये.
सूर्याभोवती एक फेरी मारण्यासाठी एखाद्या ग्रहाला जितका वेळ लागतो त्याला साधारणपणे एक सौरवर्ष म्हणतात.
आपल्या सौरमालेमध्ये सर्वात छोटं वर्ष असणाऱ्या ग्रहावरील एक वर्ष पृथ्वीवरच्या 88 दिवसांचं आहे.
पृथ्वीच्या तुलनेत आपल्याच आजूबाजूच्या ग्रहांवरील एक वर्ष किती मोठं किंवा छोटं असतं जाणून घेऊयात.
मंगळवारील एक वर्ष जवळपास पृथ्वीच्या दोन वर्षांइतकं म्हणजेच पृथ्वीवरील 687 दिवसांचं असतं.
गुरु ग्रहावरील एक वर्ष हे पृथ्वीवरील 12 वर्षांइतकं असतं.
शनी ग्रहावरील एक वर्ष हे पृथ्वीवरच्या 29 वर्ष 5 महिन्यांइतकं असतं.
युरेनसवरील एक वर्ष हे पृथ्वीरील 84 वर्षांच्या कालावधी इतकं असतं.
नेपच्युन ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी मारण्यासाठी पृथ्वीवरील कालगणनेनुसार 165 वर्ष लागतात.
सूर्यापासून सर्वात जवळ असलेल्या बुध ग्रहावरील एक वर्ष हे 88 दिवसाचं असतं.
शुक्रावरील एक वर्ष हे पृथ्वीवरील 225 दिवसांचं असतं.