एलन मस्क यांच्या आईचं नाव मेय मस्क आहे. त्या 75 वर्षांच्या आहेत. फॅशनबाबत त्या एखाद्या तरुणीलाही लाजवतील.


मेय मस्क या पेशाने मॉडेल, डायटिशियन आणि न्यूट्रिशियन आहेत. आरोग्यावर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत.


स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड स्विमसूट मॅगझीनच्या कव्हर फोटोवर झळकणाऱ्या त्या जगातील सर्वात जास्त वयाच्या मॉडेल ठरल्यात


महिलांच्या वाढत्या वयावर कमेंटकरणाऱ्यांविरोधा. मेय मस्क आक्रमकपणे उभ्या ठाकतात. आपले अनेक फोटो त्या शेअर करत असतात.


मेय मस्क यांचं 1970 मध्ये लग्न झालं. पण 1979 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना तीन मुलं आहेत.


एलन तीन वर्षांचे असतानाच आपला मुलगा बुद्धीवान असल्याचं कळलं होतं, असं मेय मस्क सांगतात. एलन यांची आपल्या आईशी खूप जवळीक आहे.


मेय मस्क या वयाच्या 15 व्या वर्षापासून मॉडलिंग करतात. त्यांचा जन्म कॅनडात झाला. पण त्यानंतर त्या दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाल्या.


डिसेंबर 2022 मध्ये मेय मस्क यांनी 1970 च्या दशकातील आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यावर लाखो लोकांनी पसंती दिली होती.

VIEW ALL

Read Next Story