सोशल मीडियावर चॅटिंग करताना हमखास वापरला जाणारा इमोजी म्हणजे स्माइली. आज 4 ऑक्टोबर रोजी स्मायली डे म्हणून साजरा केला जातो
पण तुम्हाला माहितीये का स्माइली इमोजीचा पहिल्यांदा वापर कोणी केला होता.
स्माइली इमोजी बनवणाऱ्या व्यक्तीचे नाव हार्वे रॉस बॉल असं होतं. अमिरेकीत कर्मशियल आर्टिस्ट म्हणून कार्यरत होता
2001मध्ये त्यांचे निधन झाले. मात्र, त्यांने शोध लावलेल्या स्माइलीने आजही जगाला वेड लावले आहे
1963 साली एका कंपनीने हार्वेला काही स्केच करण्यास सांगितले होते. जे बटणवर लावू शकतात
हार्वेने पिवळ्या रंगावर एक हसणाचा चेहरा बनवला जो आज स्माइली म्हणून लोकप्रिय आहे
त्याकाळी हार्वेला ही डिझाइन तयार करण्यासाठी 45 डॉलर मिळाले होते. स्माइली बनवण्यासाठी त्याला 10 मिनिटे लागले होते