केरळ हे सुंदरतेच्या बाबतीत कोणालाही निराश करत नाही. येथे येणारा प्रत्येक जण माघारी जाण्याचा कधी विचार करत नाही.
आज आम्ही देखील तुम्हाला केरळच्या सुंदर हिल स्टेशनबाबत सांगणार आहोत.
तुम्हाला जर धुक्याने झाकलेले डोंगर बघायचे असतील तर तुम्ही वायनाडचा प्लॅन करू शकता.
केरळमधील चहाच्या बागा तसेच सुंदर डोंगर बघायचे असतील तर मुन्नारचा प्लॅन करू शकता.
केरळमधील सर्वात सुंदर हिल स्टेशनपैकी एक असणारे वागामोन स्टेशन आहे.
त्याचबरोबर केरळमधील गवी नावाचे हिल स्टेशन देखील भारतातील सुंदर हिल स्टेशनपैकी एक आहे.