जगाच्या कानाकोपऱ्यात मुघल हरमच्या कहाण्या पोहोचायच्या. मग जगभरातून लोक हिंदुस्थानात यायची.
अकबरनामा लिहिणाऱ्या अबु फजलच्या दाव्यानुसार, अकबरच्या हरममध्ये साधारण 5 हजारहून अधिक महिला होत्या.
यातील अनेक महिला दासी जगभरातील वेगवेगळ्या देशातून आणल्या जायच्या.ज्यामध्ये इराण, आफ्रीका, कजाकिस्तानचा समावेश होता.
मुघल हरममध्ये भक्कम बांध्याची शरीरयष्टी असलेल्या महिलांना राणीची सेवा आणि सुरक्षेसाठी तैनात केले जायचे.
विदेशातून अशा महिलादेखील आणल्या जायच्या त्यांना भारताची भाषा किंवा हरमचे सिक्रेट्सही समजायचे नाहीत.
या महिला जीव ओतून राण्यांची सेवा, सुरक्षा करायच्या.
परदेशातून उंच, धिप्पाड किन्नरदेखील आणले जायचे. जे हरमची सुरक्षा करायचे.
या महिला आणि किन्नरांना विशिष्ट ट्रेनिंग दिली जायची.
यातील काही महिला आणि किन्नर तलवारबाजी करायचे.