त्रंब्यकेश्वर

त्रंब्यकेश्वर मंदिक हे नाशिक जिल्ह्यात आहे. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

कोपेश्वर, कोल्हापूर

कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिरही स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे.

मार्लेश्वर

मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात आहे. तसेच निसर्गाने वेढलेल्या या सुंदर डोंगरातील एका नैसर्गिक गुहेत शंकराचे शिवलिंग आहे.येथील बारामाही वाहणारा धबधबा मनमोहक आहे

कैलास शिव मंदिर, औरंगाबाद

औरंगाबाद येथील एलोरा लेणीपासून एक किमी लांब अंतरावर, 28 व्या शतकात महाराष्ट्रातील भगवान शिवच्या पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे.

धूतपापेश्वर

धूतपापेश्वर हे रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावामधील प्रसिद्ध शिवमंदिर आहे.पाप धुऊन काढणारा ईश्वर म्हणून धूतपापेश्वर. तसेच सभोवतालचा परिसर अतिशय मनमोहक असून मंदिरही प्राचीन आहे.

भीमाशंकर

भीमाशंकर हे मंदिर महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिव मंदिर आहे. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे.भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

अमृतेश्वर मंदिर

हेमाडपंती स्थापत्यशैलीचे पुरातन अमृतेश्वर मंदिर रतनवाडी गावात आहे.

अंबरनाथचे शिवमंदिर

अंबरनाथचे शिवमंदिर हे महाराष्ट्रातील भूमीज शैलीचे सर्वात प्राचीन मंदिर आहे. शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात इ.स.१०६० मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो.

VIEW ALL

Read Next Story