दहावीनंतर काय करायचं?

अनेक विद्यार्थी आहेत जे दहावीनंतरचे करिअर निवडताना गोंधळलेले असतात. आज आपण दहावीनंतर करिअर करण्यासाठीच्या पर्यायांबाबत जाणून घेणार आहोत.

सायन्स

पीसीएमबी - बारावीतील फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या चारही विषयांवर आधारित बायो केमिस्ट्री, बायो मेडिकल इंजिनीअरिंग, बायो टेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मेटिक्स, फार्मसी अशा विषयांकडे जाता येतं.

पीसीएम

या विषयांनुसार आर्किटेक्चर, डिफेन्स, नेव्ही, इंजिनीअरिंग, पायलट ट्रेनिंग, टेक्नॉलॉजीकडे वळता येतं.

पीसीबी

मेडिकल, व्हेटर्नरी सायन्स अॅण्ड अॅनिमल हजबण्डरी, पॅरामेडिकल कोर्सेस, अॅग्रीकल्चर सायन्स अशा विषयांसाठी हा ग्रुप उपयोगी पडतो.

पदवी अभ्यासक्रम

एव्हिएशन, फूड सायन्स, फोरेन्सिक सायन्स, एन्व्हायर्न्मेंटल सायन्स, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, बायो टेक्नॉलॉजी, लाइफ सायन्स, मॅथमेटिक्स यात पदवी अभ्यासक्रम करता येतो. हे सर्व कोर्स चार ते पाच वर्षांचे असून त्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

​आयटीआय

आयटीआयमध्ये बरेच ट्रेड आहेत, जे विद्यार्थी त्यांच्या पसंतीनुसार निवडू शकतात. जसे की, आयटीआय टर्नर, आयटीआय मेकॅनिक, आयटीआय वेल्डर, आयटीआय प्लंबर, आयटीआय इलेक्ट्रीशियन

डिप्लोमा

दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभियांत्रिकी विषयात डिप्लोमा करू शकतात, जसे की डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजीनियरिंग, डिप्लोमा इन टेक्सटाइल इंजीनियरिंग, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजीनियरिंग, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन सिविल इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन आयसी इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन ईसी इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन माइनिंग इंजिनीअरिंग

​फाइन आर्ट्स परफॉर्मिंग आर्ट्स

आर्ट अॅण्ड क्राफ्ट, सिरॅमिक अॅण्ड पॉटरी, डान्स, ड्रॉइंग, फर्निचर अॅण्ड इंटेरिअर डिझाइन, म्युझिक, स्कल्प्चर अशा कलेशी संबंधित विषयांमध्येही करिअर होऊ शकतं. लहानपणापासून या विषयांचा अभ्यास केला तर त्यात करिअरसाठी उत्तम संधी आहेत.

बॅचलर इन डिझायनिंग

काळानुरुप प्रत्येक वस्तूचं डिझाइन बदलत राहतं. प्रत्येक वस्तू वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केली जाते. हे डिझाइन करण्यासाठी प्रोडक्ट डिझाइन, फर्निचर अॅण्ड इंटिरिअर डिझाइन, सिरॅमिक अॅण्ड ग्लास डिझाइन, ग्राफिक डिझाइन, अॅनिमेशन, व्हिडिओ कम्युनिकेशन अशा प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

पॉलिटेक्निक अभ्यासक्रम

दहावीनंतर विद्यार्थी मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल, कॉम्प्युटर, ऑटोमोबाईल या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांसाठी जाऊ शकतात. ही महाविद्यालये 3 वर्षे, 2 वर्षे आणि 1 वर्षासाठी पदविका अभ्यासक्रम चालवतात. खर्च-प्रभावीता, कमी कालावधीत नोकरी हे 10 वी नंतर डिप्लोमा कोर्सचे फायदे आहेत.

VIEW ALL

Read Next Story