नाशिकमधील हरिहर हा किल्ला जगातील भक्कम किल्ल्यांपैकी एक मानला जातो. हा किल्ला खुप प्रसिध्द आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या उंच डोंगररांगांमधल्या किल्ल्यावर पोहचायला 117 पायऱ्या चढाव्या लागतात.
नाशिकमधील हरिहर किल्ला काबीज करण्यासाठी इंग्रजांनी तोफा चालवल्या पण त्यांना यश मिळालं नाही. त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले.
गिरिदुर्ग हरिहर हा किल्ला सुमारे 3,676 फीट उंच आहे.
या भक्कम किल्ल्यावर चढणे सोपे नाही. हरिहर चढाईसाठी कठीण आहे. त्यामुळे चढताना खुप सावधगिरी बाळगायला लागते.
हरिहर किल्ल्याचा आकार लोलकसारखा आहे. हा किल्ला दोन बाजूंनी 90 आणि तिसऱ्या बाजूने 75 डिग्री आहे.
हा किल्ला 9 व्या ते 14 व्या शतकापर्यंतच्या मधल्या काळात बांधला असावा असा अंदाज आहे.