कित्येक जण तिकीट न मिळाल्याने ट्रेनमध्ये उभे राहून प्रवास करतात.
अशा परिस्थितीमध्ये तुम्ही चालत्या ट्रेनमध्ये किती सीट रिकामे आहेत हे शोधू शकता.
त्यासाठी तुम्हाला प्रथम IRCTC अॅप किंवा IRCTC च्या वेबसाईटवर जा.
त्यानंतर ट्रेन पर्यायावर क्लिक करून पुढे चार्ट व्हेकन्सीवर क्लिक करा. चार्ट व्हेकन्सी ओपन झाल्यानंतर त्यामध्ये ट्रेनचे नाव आणि नंबर टाका.
बोर्डिंग स्टेशन निवडताच तुम्हाला संपूर्ण माहिती तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल.
त्यानंतर तुम्हाला कोणत्या डब्यात किती जागा रिकाम्या आहेत हे माहिती होईल.