बराच काळ फोन वापरल्यानंतर त्याची स्पीड ही कमी होते. त्यामुळे आपला फोन हा हॅंग होऊ लागतो.
तुम्ही जे अॅप वापरत नसाल ते अनइंस्टॉल करा. त्यानं फोनची स्पीड वाढेल.
अनेकदा कैश जास्त असल्यामुळे फोन स्लो होतो. त्यामुळे फोनची स्पीड कमी होती. सेटिंग्समध्ये जाऊन कैश क्लिअर करा.
जर तुमच्या फोनची मेमरी फूल झाली असेल तर फोटो, व्हिडीओ आणि इतर फाईल या मेमरी कार्डमध्ये स्टोअर करा.
जर तुमचा फोन अतिशय स्लो सुरु असेल किंवा हॅंग होत असेल तर सॉफ्टवेअर अपडेट करा जेणे करून फोनची स्पीड ही नॉर्मल होईल.
अनेक अॅप बॅकग्राऊंडला सुरु असल्यानं देखील फोन स्लो होतो. त्यामुळे तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन बॅकग्राउंड प्रोसेस बंद करा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)