दहावीचा निकाल लागला. आता विद्यार्थ्यांची अकरावीसाठीच्या प्रवेशासाठी धावपळ सुरु झालेय. बऱ्याच पालकांना आणि विद्यर्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत माहिती नसते. पाहा कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत.
विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे तिथे एकदा जाऊनसुद्धा चौकशी केली पाहिजे. तुम्हाला अधिकची माहिती मिळू शकते.
प्रत्यके महाविद्यालयात नोटिस बोर्डवर महत्वाच्या सूचनांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची लिस्ट लावलेली असते. तिथूनसुद्धा तुम्ही एकदा चेक करू शकता.
1) जन्म दाखला (Birth Certificate) 2) दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)
3) रेशन कार्ड (Ration Card) 4) ओळखपत्र फोटोसह (ID card with photo)
5) आधार कार्ड (Aadhaar Card) 6) घराचं इलेक्ट्रिक बिल (electric bill)
7) 10 वीची मार्कशिट (10th mark sheet) 8) जातीचे प्रमाणपत्र (Caste certificate)
9) दहावीच्या परीक्षेची हॉल तिकीट (11th Admission) 10) नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट (Non-Creamy Layer certificate/ Income Certificate)
दहावीचा निकाल लागला. आता विद्यार्थ्यांची अकरावीसाठीच्या प्रवेशासाठी धावपळ सुरु झाले आहेत. अकरावीत सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स फिल्डमध्ये प्रवेशासाठी ही सगळी कागदपत्रे महत्वाची आहेत.