मुख्यमंत्र्यांचं गाव

मुख्यमंत्र्यांच्या साताऱ्यातील गावाजवळच आहेत भटकंतीची स्वस्तात मस्त ठिकाणं; तुम्ही कधी जाताय?

Jan 23,2024


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा 3 दिवसांसाठी त्यांच्या साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी येत आहेत. 25 जानेवारी रोजी त्यांच्या गावातील देवाची यात्रा असल्यामुळं त्यांची या प्रसंगी उपस्थिती असेल.

साताऱ्यातील इतर ठिकाणं...

इथं मुख्यमंत्री त्यांच्या गावाला भेट देत असतानाच सातारा आणि नजीकच्या पर्यटनस्थळांचीही नावं समोर आली आहेत. तुम्हीही पाहा ही स्वस्तात मस्त ठिकाणं....

वेण्णालेक

महाबळेश्वरमधील वेण्णालेकला तुम्ही भेट देऊ शकता. इथं बोटिंगचाही आंद घेऊ शकता.

कृष्णाई मंदिर

महाबळेश्वर मंदिरानजीकच असणारं कृष्णाई मंदिर म्हणजे कलेचा अप्रतिम नजराणा.

एलिफंट पॉईंट

पाचगणी महाबळेश्वर मार्गावर असणारा हा एलिफंट पॉईंट पाहताना निसर्गाची किमया आपल्याला अवाक् करून जाते.

पाचगणी

मुख्यमंत्र्यांच्या दरे गावापासून काहीशा अंतरावर असणाऱ्या पाचगणीमध्ये येऊन तुम्ही काही निवांत क्षणांचा आनंद घेऊ शकता.

भिलार

पुस्तकांचं गाव, अशी ओळख असणारं भिलार हे देशातील पहिलं पुस्तकांचं गाव आहे.

देवराई आर्ट विलेज

निसर्गाला कलेची जोड मिळाल्यास होणारा आविष्कार तुम्हाला इथं पाहता येईल. इतकंच नव्हे तर येथील अनेक उपक्रमांमध्येही सहभागी होता येईल.

VIEW ALL

Read Next Story