16 एप्रिल

संजय राऊतांनी त्यांच्या रोखठोक सदरात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा एक संदर्भ दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ’पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही”, असं संजय राऊतांनी लेखात म्हटलं.

16 एप्रिल

16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर अजित पवार म्हणाले की, 16 लोक अपात्र होतील. अपक्ष धरून भाजपकडे 115 आमदार आहेत. 106 भाजप आणि 9 अपक्ष असे. आणि एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले 40. त्यांच्याकडील अपक्ष बाजूला ठेवा, कारण अपक्ष हा विचार करतात की, ज्यांचं सरकार येईल त्यांच्याबरोबर. त्यामुळे 40 आणि 115 असे 155 झाले.

12 एप्रिल

अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर भेट घेतली. या बैठकीतील विशेष बाब म्हणजे अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार विशेष पॅकेजची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.

12 एप्रिल

महाराष्ट्र राज्य बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित कंपनीच्या नावाचा उल्लेख केला आहे. पण अजित पवार आणि त्यांच्या पत्नीच्या नावाचा आरोपपत्रात थेट उल्लेख केलेला नाही. या प्रकरणाची सुनावणी 19 एप्रिल रोजी होणार आहे.

11 एप्रिल

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेतली. महाविकास आघाडीतील एकजुटीच्या मुद्द्यावर ही बैठक झाल्याची सध्या चर्चा आहे.

7 एप्रिल

हिंडेनबर्ग अहवालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी समूहाला ठरवून लक्ष्य करण्यात आल्याचे नमूद करत पवार यांनी ‘जेपीसी’ चौकशीच्या मागणीलाही विरोध केला होता.

Maharashtra NCP Crisis: 7 ते 16 एप्रिलदरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नेमका कुठं सुरुंग लागला?

VIEW ALL

Read Next Story