नेहमीच्या लोणावळा आणि नजीकच्या धबधब्यांऐवजी आज आपण कोकण पट्ट्यामध्ये येणाऱ्या काही धबधब्यांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग, पाहूया कोकणातील 10 जबरदस्त धबधबे
कोकण पटट्यापासून काहीसं दूर असणाऱ्या भंडारदरा येथे असणारा एखाद्या छत्रीप्रमाणं दिसणारा हा अम्ब्रेला धबधबा. पूर्णपणे प्रवाहित झाल्यानंतर या धबधब्याचं सौंदर्य आणखी बहरतं. त्यामुळं तुम्ही इथंही भेट देऊ शकता. (सर्व छायाचित्र- सोशल मीडिया)
सह्याद्री रांगामध्ये दडलेल्या देवकुंड धबधब्यानं आजवर मोठी गर्दी खेचली. इथंल निसर्गसौंदर्य पाहताक्षणी काळजात भरतं. पण, हुल्लडबाजांच्या गोंधळामुळं काही पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळं इथं हल्ली प्रवाशांना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
रायगडच्या खोपोली भागात मुंबईपासून स्वत:च्या वाहनानं अगदी सोप्या पद्धतीनं पोहोचता येतं. तिथंच झेनिथ धबधबा तुमच्या नजरेत पडतो. ट्रेकिंग, रॉक क्लाईंबिंग या अशा थराराचा अनुभव इथं तुम्ही घेऊ शकता.
पश्चिम महाराष्ट्रातील कुणे मार्गावरच हा धबधबा आहे. साधारण 622 फुंटांवरून या धबधब्याचा उगम होऊन तो तीन टप्प्यांमध्ये खाली येतो. पर्यटकांसाठी हा धबधबा आकर्षणाचा विषय आहे.
मार्लेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांसोबतच इथं प्रवाहित होणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. साधारण 500 फुटांवरून हा धबधबा खाली येतो.
पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक लोकप्रिय आणि तितकाच सुंदर धबधबा म्हणजे ठोसेघर. इथं येऊन निसर्गसौंदर्य पाहणं म्हणजे एक अद्वितीय अनुभव.
कोकणातील सौंदर्याचा अद्वितीय नमुना म्हणजो अंबोली घाटातील धबधबा. या धबधब्याचा प्रवाह अगावर काटा आणतोच शिवाय निसर्गाच्या अगाध लीलाही दाखवतो.
ताम्हिणी घाटातून जाताना प्रवाहित झालेल्या ताम्हिणी धबधब्याचं सौंदर्य अनेकांच्या मनाचा ठाव घेतं. तळाशी असणारं कुंड आणि वरून कोसळणारा धबधबा अनेकांसाठीच परवणी.
कोकण पट्ट्यात येणारा भिवपूरी धबधबा मुंबईकरांच्या आवडीचा. इथं तुम्ही ऑगस्ट- सप्टेंबरपर्यंतही येऊ शकता.
साधारण 600 फुटांच्या उंचीवरून कोसळणारा हा धबधबा पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख आकर्षणांपैकी एक. आठवडी सुट्टीसाठी हा उत्तम पर्याय.