मुकेश अंबानींची दिवाळी ऑफर, 13 हजाराच्या आत मिळतोय लॅपटॉप!

Pravin Dabholkar
Oct 13,2024


देशात दिवाळीचा सण आलाय. मुकेश अंबानींनी देशवासियांसाठी बंपर ऑफर आणली आहे.


2023 मध्ये लॉंच झालेल्या जिओ बुकच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे.


अमेझॉन आणि रिलायन्स डिजिटलवरुन तुम्ही लॅपटॉप खरेदी करु शकता.


हा एन्ड्राइड फोरजी लॅपटॉप आहे. जिओबुक 11 चा उपयोग तुम्हाला ऑफिसच्या कामासाठी होऊ शकतो. विद्यार्थ्यांनादेखील याचा फायदा होऊ शकतो.


यामध्ये मीडिया टेक 8788 सीपीयू मिळतो. जो जिओ ओएसवर काम करतो. तुम्ही फोरजी मोबाईल नेटवर्कशी कनेक्ट करु शकता.


याची स्क्रिन 11.6 इंच असून वजन 990 ग्रॅम इतके आहे. हा लॅपटॉप सिंगल ब्लू कलरमध्ये येतो. यात 64 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम मिळते.


यात 8 तासाची लाइफ असलेली बॅटरी मिळेल. तसेच यावर 12 महिन्याची वॉरंटी मिळतेय.


लॅपटॉपला इन्फिनीटी किबोर्ड मोठा टचपॅड देण्यात आलंय.


हा लॅपटॉप 16 हजार 449 रुपयाच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता.


पण आता हा लॅपटॉप 12 हजार 890 रुपयांमध्ये मिळणार आहे.

VIEW ALL

Read Next Story