पावसाळा सुरु झालाय आणि तुम्हाला निसर्गात जाण्याचा मोह आवरता येत नाही. तुम्ही प्रसिद्ध असा ठिकाणांना भेट देऊन निसर्गाचा आनंद लुटू शकता. शहरातील धावपळीच्या युगातून काही दिवासंचा ब्रेक घ्यायचा असेल तर? कोकणातील धबधबे तुमच्यासाठी खुणावत आहेत. हिरवागार पसरलेल्या निर्सगाच्या सानिध्यात गेलात तर थकवा दूर होईल आणि नवा उत्साह तुम्हाला मिळेल.
महाबळेश्वरमध्ये 600 फूट उंचीवर लिंगमाला धबधबा आहे. हा धबधबा पर्यटक आणि स्थानिक लोकांसाठी लोकप्रिय आकर्षणांपैकी एक आहे. हिरवाईने आणि धुक्याच्या पाण्याने वेढलेल्या या ठिकाणाला अनेक जण भेट देत असतात. येथे प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती 15 रुपये आहे.
कर्जत येथे भिवपुरी धबधबा आहे. निसर्ग सानिध्याचा आनंद लुटता येतो. विशेषतः पावसाळ्यात भेट देण्याचे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. कुटुंबांसोबत जाण्यासाठी चांगले ठिकाण
ताम्हिणी घाटातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक म्हणजे ताम्हिणी धबधबा. याच्या पायथ्याशी एक पूल आहे. वीकेंडला येथे गर्दी पाहायला मिळते.
आंबोली धबधबा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे आहे. हे एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. वैविध्यपूर्ण वनस्पती येथे पाहायला मिळतात.
ठोसेघर धबधबा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. देशातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असल्याने, कॅस्केड्स सर्वात चित्तथरारक दृश्यांपैकी एक. हिरवाईने वेढलेले हे निसर्गप्रेमींसाठी छान ठिकाण आहे.
मार्लेश्वर धबधबा रत्नागिरी जिल्ह्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर शिवमंदिर प्रसिद्ध आहे. या ठिकाणचा धबधबा स्थानिकांमध्येही लोकप्रिय आहे. जवळपास 500-पायऱ्यांचा चढ चढून येथे जाता येते. देशातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असल्याने येथे नेहमी गर्दी दिसून येते.
कुणे धबधबा महाराष्ट्रातील पुण्याच्या कुणे गावाजवळ आहे. हा धबधबा 622 मीटर उंचीवर आहे. पावसाळ्याच्या दिवसात पर्यटकांची गर्दी दिसते. नैसर्गिक तलावांमध्ये पोहणे आणि आंघोळ करण्यासाठी लोक भेट देत असतात.
झेनिथ धबधबा, मुंबईपासून रायगडच्या खोपोली येथे सुमारे 80-90 फूट उंचीवर आहे. हा धबधबा प्रामुख्याने पावसाळ्यात प्रवाहित राहतो. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रॅपलिंग करता येते. मित्र किंवा कुटुंबासह येथे घालवलेले काही तास शहरी जीवनाच्या गजबजाटापासून दूर ठेवतात.
देवकुंड धबधबा या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. सह्याद्रीच्या कुशीत घनदाट जंगलातून 3 तासांचा थरारक ट्रेक करावा लागतो. हा एक मस्त धबधबा आहे. स्वच्छ पाणी पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये एक दिवसाच्या पिकनिकसाठी लोकप्रिय आहे!