हा धबधबा सातारा जिल्ह्यातील तारळी नदीवर आहे.
150 ते 180 मी.उंचीवर वाहणारा हा धबधबा पश्चिम घाटामधील निसर्गाचा एक मोठा अविष्कार आहे.
सातारा शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर ठोसेघर गाव आहे. या गावातच हा धबधबा आहे. गावाच्या नावावरुनच हा धबधबा ठोसेघर धबधबा म्हणून ओळखला जाते.
सातारा रेल्वे स्थानकातून तसेच सातरा बस स्थानकातून ठोसेघर धबधबा येथे जाण्यासाठी बसची सोय आहे.
सातारा जिल्ह्यातील ठोसेघर धबधबा सह्याद्रीच्या सौंदर्यात भर घालतो.
ठोसेघर धबधब्याचे एकूण 3 मुख्य प्रवाह वाहतात.
ठोसेघर धबधब्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गॅलरी बांधण्यात आली आहे. तसेच जाळ्या देखील लावण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक पर्यटक सुरक्षा कठडे ओलांडून स्वत: जीव धोक्यात घालतात.