गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे आगमन होताना चंद्र अशुभ मानले जाते.

हिंदू धर्मानुसार गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध मानले जाते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे आगमन होताना चंद्र का पहायचा नसतो. यामागे रंजक दंतकथा आहे.

पौराणिक कथेनुसार भगवान शंकरांकडून मस्तक कापल्यानंतर, माता पार्वतीच्या आक्रोशाने गणेश यांना गजमुखाचे मस्तक लावून पुनरुज्जीवित करण्यात आले यावेळी चंद्रदेव त्यांच्यावर हसले.

भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी कोणीही तुमचे तोंड पाहणार नाही असा शाप गणेशाने चंद्रदेवाला दिला.

चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे पाहिल्यास चोरीचा आळ लागेल असा हा शाप होता.

भगवान श्रीकृष्णाने चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेतले होते. यामुळे त्यांच्यावर चोरीचा खोटा आरोप झाला अशी देखील अख्यायिका आहे.

VIEW ALL

Read Next Story