देशात टोमॅटोच्या किंमतीने कळस गाठलाय. अनेक राज्यात टोमॅटो 160 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत.
टोमॅटोच्या वाढलेल्या दरावरुन बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने एक वक्तव्य केल होतं, त्यावरुन बराच वाद निर्माण झाला आहे.
सुनील शेट्टीच्या वक्तव्यावरुन शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
सुनील शेट्टीच्या वक्तव्याचा विरोध म्हणून शेतकऱ्यांनी सुनील शेट्टीच्या घरी टोमॅटो पाठवले
एका मुलाखतीत सुनील शेट्टीने टोमॅटोच्या वाढत्या दराचे परिणाम स्वंयपाकघरात दिसायले लागले आहे. टोमॅटो खाण्याचं कमी केले असल्याचं त्याने म्हटलं होतं.
लोकांना वाटतं की सुपरस्टार लोकांना वाढलेल्या किमतीचा फरक पडत नाही. पण हे खोटं आहे. आम्हालाही या समस्यांना सामोरं जावं लागतं, असं सुनील शेट्टीने म्हटलं होतं.
यावर शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा टोमॅटो 2 रुपये किलो होते त्यावेळी शेतकऱ्यांच्या मेहनतीच कोणाला कदर नव्हती.
टोमॅटोला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ आली होती. तेव्हा सुनील शेट्टी कुठे होता असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय.
सुनील शेट्टी वर्षाला 100 कोटी रुपये कमवतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
पण तेच जर शेतकरी चार पैसे जास्त कमवत असेल तर सुनील शेट्टीच्या पोटात दुखतं का? असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय.