बाप्पा मोरया! ही आहेत मुंबईतील पाच प्रसिद्ध गणेश मंडळं

जसे कोकणामध्ये गणेशोत्सवाची गजबज असते तसेच गणपती आणि मुंबई यांच नात काही वेगळचं आहे. आणि याचा महत्त्वाचा भाग म्हणजे मुंबईतील मंडळे . या मंडळांमध्ये दरवर्षी सजावट ,मूर्ती नाविण्यासाठी चुरस बघायला मिळते.

लालबागचा राजा

गेल्या 85 वर्षांपासून हे मंडळ सर्वांत जास्त नावाजलेले आहे . लालबागच्या राजाची शान ही दरवर्षी वाढत चालली आहे .गणेशोत्सवात राजाचं दर्शन घ्यायला लाखोंच्या संख्येत भाविक येतात . तासनतास लोक रांगेत उभे असतात. याला सिलेब्रेटींचा बाप्पासूद्धा म्हणतात.

मुंबईचा महाराजा

मुंबईच्या गणेश गल्लीमध्ये विराजमान होणारा हा गणपती, लालबागच्या राजापासून काहीच गल्ल्यांच्या आंतरावर आहे. मिल कामगारांसाठी 1928 साली मंडळाची स्थापना करण्यात आली.

जे.एस.बी सेवा मंडळ

1951ला विजयादशमीच्या दिवशी मंडळाची स्थापना झाली. हा गणपती संपुर्ण सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांनी मडवलेला असतो. ही संस्था जनसेवा करण्यात अग्रगण्य असते.

चिंचपोकळीचा चिंतामणी

हा चिंतामणी चिंचपोकळीच्या पुलाखाली विराजमान होतो . 1920 साली 20-25 जाणांच्या गटाने मिळून 'चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ' सुरु केले. जवळपास 23 फुटाची मूर्ती मंडळ बसवते. 10 दिवस चिंतामणीसमोर गाजावाजा असतो.

खेतवाडीचा राजा

1959 साली स्थापित झालेले हे मंडळ 2000 ला नावारुपास आले भारताच्या इतिहासातील सर्वांत उंच मूर्ती बसवण्याचा विक्रम या मंडळाच्या नावावर आहे. विशेष म्हणजे या गल्लीत पावलोपावली मूर्त्या बघायला मिळतात.

VIEW ALL

Read Next Story