भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन तारखेपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा सज्ज झालाय.

Jan 02,2024


रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहसुद्धा रोहित शर्माबरोबर दक्षिण आफ्रिकेत होती. पण सामन्याआधी ती मुंबईत परतली.


रोहित शर्मा आणि रितिकाने दक्षिण आफ्रिकेत नव्या वर्षाचं स्वागत केलं. पण मुंबईत येताच रितिकाने थेट मुंबई महापालिकडे तक्रार केली.


रितिका सजदेहने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यात तीने मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेबाबात (Mumbai Air Quality Index) मुंबई महापालिकेकडे तक्रार केली आहे.


नव्या वर्षात हवामान सुधारण्यासाठी काही संकल्प केला आहे का? असा प्रश्न रितिकाने बीएमसीला केला आहे


दरम्यान, रोहित शर्मा सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 3 जानेवारीपासून दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.


भारतीय क्रिकेट संघाला पहिल्या कसोटी सामन्यात लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. बॉक्सिंग डे कसोटी भारतीय संघ एक इनिंग आणि 32 धावा्ंनी पराभूत झाला होता.

VIEW ALL

Read Next Story