भाविकांना मिळणार विशेष सुविधा

श्री सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी असते. पूजा साहित्य विक्रेत्यांमुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पूजा साहित्य विक्रेत्यांना गाडगीळ मार्गावर स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आहे.

सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

याअंतर्गत मंदिराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय दादर रेल्वे स्थानक (पश्चिम) ते सिद्धिविनायक मंदिरादरम्यान दर पाच मिनिटांनी बेस्टची मिनी बस सुरू करण्यात येणार आहे.

या प्रकल्पात भाविकांसाठी स्वतंत्र रस्ता तयार करण्यात येणार आहे. सिद्धीविनायक मंदिराजवळ मेट्रोचे काम देखील सुरु आहे. ही कामे लवकरच सुरू होणार आहेत.

हा प्रकल्प सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर आणि पालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. याशिवाय महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रकल्पाचे काम केले जाणार आहे.

या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने रस्ता रुंदीकरण, मंदिराच्या दोन्ही बाजूंना प्रवेशद्वार, आधुनिक शौचालये, दिव्यांग, गरोदर महिला, ज्येष्ठांना दर्शन रांगेत तात्पुरती बसण्याची व्यवस्था, ऊन आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी छताची व्यवस्था करण्यात येणार आहे.

VIEW ALL

Read Next Story