50 वर्षांनंतर जुळून येतोय त्रिग्रही योग, 'या' 3 राशींवर पैशांचा पाऊस

मकर राशीत त्रिग्रही योग

12 फेब्रुवारीला मकर राशीत त्रिग्रही योग जुळून येत आहे. या दिवशी बुध, शुक्र आणि मंगळ तिन्ही ग्रह मकर राशीत विराजमान होणार आहेत.

तिन्ही ग्रह तब्बल 50 वर्षांनी एकत्रित

1 फेब्रुवारीला बुध मकर राशीत, यानंतर 5 फेब्रुवारीला मंगळ आणि 12 फेब्रुवारीला शुक्र या राशीत पोहोचतील. मकर राशीत तिन्ही ग्रह तब्बल 50 वर्षांनी एकत्रित असणार आहेत.

ज्योतिषांनुसार, मकर राशीत तिन्ही ग्रहांची युती तीन राशींसाठी शुभ मानली जात आहे.

मेष

नोकरी, व्यवसायात चांगलं यश मिळेल. बढती, पगारवाढ होऊ शकते. वडिलांच्या संपत्तीचा लाभ मिळू शकतो. वरिष्ठांचं सहकार्य मिळेल.

या काळात व्यापारी एखादी मोठी डील साइन करु शकतात. गुंतवणुकीसाठीही योग्य वेळ आहे. रोखलेलं धन मिळू शकतं.

धनु

अचानक धनप्राप्ती होऊ शकते. चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते. बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी चांगल्या नोकरीची संधी निर्माण होईल.

मकर

आत्मविश्वास वाढल्याने करिअरमध्ये फायदा होईल. सरकारी कामं पूर्ण होतील. आर्थिक स्थिती आधीपेक्षा चांगली होईल.

वैवाहिक आयुष्य आनंदी असेल. जोडीदाराचं पूर्ण सहकार्य मिळेल. सन्मानात वाढ होईल. आई-वडिलांची प्रकृती सुधारेल.

VIEW ALL

Read Next Story