मुंबईकरांना 'स्टिंग रे', 'जेलीफीश'चा धोका, समुद्र किनारी 'अशी' घ्या काळजी

पालिकेचे निर्देश

मुंबईच्या समुद्रकिनारी 'जेली फीशने दंश' केल्याच्या घटना समोर येत आहे. एखाद्या नागरिकास मत्स्यदंश झाल्यास काय करावे? याचे निर्देश पालिकेकडून देण्यात आले आहेत.

लहान मुलांना पाण्यामध्ये नेऊ नका

नागरिकांनी समुद्रामध्ये जाताना उघड्या अंगाने जावू नये, तसेच पाण्यामध्ये 'गमबुट' वापरावेत आणि लहान मुलांना पाण्यामध्ये नेऊ नये.

खाज सुटते

'स्टींग रे’चा दंश झाल्यास, अशा दंशामुळे नागरिकांना दंशाच्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशचा संसर्ग झाल्यास त्यांच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.

स्पर्शक काढा

जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाका

खबरदारी घ्या

जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही याची खबरदारी घ्या

स्वच्छ पाण्याने धुवा

मस्त्यदंश झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढा. जखम झालेल्या जागी बर्फ लावावा.

प्रथमोपचार

स्टींग रे किंवा जेली फिशचा दंश झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आपल्या नजीकच्या प्रथमोपचार केंद्रात किंवा रूग्णालयात जाऊन प्रथमोपचार घ्यावेत.

पथकाशी संपर्क

मस्त्यदंश झाल्यास चौपाटी परिसरातील वैद्यकीय पथकाशी संपर्क करा.

VIEW ALL

Read Next Story