Isle of Bombay असंही या बेटाला संबोधलं जातं. ब्रिटिशांच्या काळात या बेटाला 'मध्यवर्ती बंदर' म्हणून ओळखलं जात असे. डोंगरी ते मलबार हिलचा भाग म्हणून हे बेट आहे.
माहीम हे मुंबईतील दुसरे बेर 13 व्या शतकात राजा भीमदेव यांचं राज्य होतं. तेव्हा माहीम ही त्यांची राजधानी होती. माहीम बेटावर मुस्लिमांचं राज्य होतं.
ब्रिटिशांअगोदर या बेटावर पोर्तुगीजांच राज्य होतं. या बेटाला 'कँडील' बेट म्हणून संबोधल जात होतं. 1534 साली पोर्तुगीजांनी हे बेट जिंकल असून त्यावार ताबा मिळवला.
परळ हे बेट सूत गिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे. या राज्यातही राजा भीमदेवाचा राज्य होतं. बॉम्बेचे ब्रिटिश राज्यपाल विलियम हॉर्नबी यांनी राहण्यासाठी परळ हे बेट निवडलं. त्यामुळे याला अधिक महत्त्व आले.
मासेमारी करणाऱ्या लोकांचं गाव म्हणून माझगाव ओळखले जाते. पोर्तुगीजांच्या ताब्यात हे बेट असून येथे अनेक चर्च आहेत. तसेच हे बेट मासेमारी आणि मालवाहतुकीचं केंद्र म्हणून ओळखलं जात असे.
वरळी हे त्याकाळी शहराच्या राजधानीला जोणारं केंद्र होतं. वरळीत मोठ्या प्रमाणावर कार्यालयं आणि उद्योगधंदे आहेत.
हे बेट कुलाब्याजवळ आहे त्यामुळे त्याला लिटिल कुलाबा म्हटलं जातं. येथे कोळी बांधव मोठ्या प्रमाणावर राहतात.