Share Market: 1 लाख गुंतवले 81 लाख मिळवले! अवघ्या 3 वर्षात 'या' कंपनीकडून 830% परतावा

Published by: Swapnil Ghangale | Jun 25, 2024

रिस्क गरजेची

शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना थोडी रिस्क घेणं आवश्यक असतं. मात्र त्याबरोबरच थोडी नशिबाची साथही लागते असं म्हटलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 25, 2024

झटपट कमाई म्हणूनही शेअर बाजाराकडे पाहिलं जातं

अर्थात आज अगदी मोबाईलच्या माध्यमातूनही शेअर्सची खरेदी-विक्री करता येत असल्याने नेमकं कुठे आणि कशी गुंतवणूक करावी याचा फारसा अभ्यास न करता झटपट कमाई म्हणूनही शेअर बाजाराकडे पाहिलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 25, 2024

अपेक्षेहूनही अधिक परतावा मिळू शकतो

मात्र विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वी गुंतवणूक केल्यास अपेक्षेहूनही अधिक परतावा मिळू शकतो. याचीच झळक दाखवणारी एक यादी सध्या व्हायरल होतेय.

Published by: Swapnil Ghangale | Jun 25, 2024

या कंपनीने दिला अभूतपूर्व परतावा

उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्याला Waaree Renewable Technologies Renewable कंपनीचं नाव घेता येईल.

Published by: Swapnil Ghangale | Jun 25, 2024

किंमत 830 टक्क्यांनी वाढली

मागील एका वर्षात Waaree Renewable Technologies Renewable कंपनीच्या शेअर्सची किंमत 830 टक्क्यांनी वाढली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jun 25, 2024

दमदार कामगिरी

Waaree Renewable Technologies Renewable कंपनीच्या शेअर्सने केलेल्या दमदार कामगिरीची आकडेवारी 'आयसीआयसीआय डायरेक्ट'ने मांडली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jun 25, 2024

81 लाख रुपये परतावा

म्हणजेच या कंपनीमध्ये 3 वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीने 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्या व्यक्तीला 81 लाख रुपये परतावा मिळाला असता, असं आयसीआयसीआय सांगते.

Published by: Swapnil Ghangale | Jun 25, 2024

या कंंपनीने 1 लाखाचे 79 लाख दिले

त्याचप्रमाणे केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीमध्ये 3 वर्षांपूर्वी 1 लाख गुंतवणाऱ्याला आजच्या घडीला एकूण परतावा 79 लाख 57 हजार रुपये इतका मिळाला असता.

Published by: Swapnil Ghangale | Jun 25, 2024

सर्वाधिक परतावा देणाऱ्या टॉप 20 कंपन्या पाहाच

'आयसीआयसीआय डायरेक्ट'ने शेअर केलेली ही संपूर्ण यादी पाहा. यातील टॉप 20 पैकी सर्वात कमी परतावा देणाऱ्या कंपनीने 1 लाखांचे जवळपास 6 लाख करुन दिलेत.

Published by: Swapnil Ghangale | Jun 25, 2024

गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्या

Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती स्टॉक्स ब्रोकरेजकडील आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.

Published by: Swapnil Ghangale | Jun 25, 2024

VIEW ALL

Read Next Story