आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात जीवनातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
नीतीशास्त्रातील काही गोष्टींचा अवलंब केल्यास जगणं सोपं होतं. त्यामुळे नीतीशास्त्र समजून घेण्याकडे सामान्यांचा कल असतो.
यामध्ये पुरुषांकडे कोणते गुण असल्याने महिला खूश होतात, याची माहिती दिलीये.
जीवन जगण्यासाठी कठोर परिश्रम करणं गरजेचं आहे. परिश्रमाच्या जोरावर जितकं मिळेल त्यावर समाधानी राहणं गरजेचं आहे.
पुरुषाने निर्भय राहणं गरजेचं आहे. कुटुंब आणि पत्नीच्या मागे खंभीरपणे उभं राहणं गरजेचं आहे.
पुरुषांनी आपल्या सर्व जबाबदाऱ्या वेळोवेळी पार पाडल्या पाहिजेत. यामुळे महिलांना आनंद मिळतो.