रिकाम्या कुंड्या घरात 'या' दिशेला ठेवल्यास मिळतात 3 लाभ!

वास्तूशास्त्रानुसार तुम्ही घरात काय ठेवता, कुठे ठेवता याला अतिशय महत्त्व आहे. तुमची एक चुक संकटांना निमंत्रण ठरते, असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलंय.

वास्तूशास्त्रानुसार घरात रिकामी, जुनी आणि तुटलेली भांडी ठेवणं अशुभ मानले जाते.

मात्र रिकामी कुंडी घराच्या योग्य दिशेला ठेवल्यास ते शुभ असून त्यातून तुम्हाला लाभ होतो.

घरात रिकाम कुंडी ही दक्षिण दिशेला ठेवणं शुभ मानले जाते.

रिकामी कुंडी ठेवल्यास राहूचा प्रभाव कमी होतो. त्याशिवाय वास्तूदोष दूर होतो असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलंय.

रिकाम्या कुंडीत घरातील सदस्यांवर येणाऱ्या समस्या दूर करण्यास मदत होते. ही नकारात्मक शक्ती रिकाम्या कुंडीत जाते आणि ती कुंडी तुटते. अशावेळी ती घरातून काढून दुसरी रिकामी कुंडी त्या जागी ठेवावी.(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story