धनत्रयोदशीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. येत्या शुक्रवारी 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे. यादिवशी मोठ्या प्रमाणात नवीन वस्तूची खरेदी करण्यात येते.

Nov 07,2023


लक्ष्मी-गणेश चांदीच्या नाण्यांची किंमत आणि व्हिक्टोरिया सिल्व्हर कॉईनला बाजारात मोठी मागणी असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, 20 ग्रॅम आणि 50 ग्रॅमच्या नाण्यांची अधिक खरेदी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


या दिवशी सोन्या-चांदीच्या नवीन वस्तू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, अशी मानता आहे. सोन्या-चांदीबरोबरच भांडी किंवा इतर वस्तू खरेदी करणे देखील शुभ मानलं जातं.


दिल्ली-एनसीआर सोबतच यूपी, बिहार, मुंबई, पंजाब, महाराष्ट्र या राज्यांतील अनेक ज्वेलर्स ग्राहकांना सूट दिवाळी आणि धनत्रयोदशी विशेष सूट देत आहेत.


डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून ज्वेलर्सच्या दुकानातून खरेदी केल्यास तुम्हाला 3 ते 5 टक्के सूट मिळते.


एवढंच नाही तर 25 हजार रुपयांहून अधिकची खरेदी केल्यास तुम्हाला चांदीचं नाणेही मोफत देण्यात येतं.


धनत्रयोदशीच्या निमित्ताने बाजारात 5 ग्रॅम चांदीचं नाणं 800-1000 रुपयं, 10 ग्रॅम चांदीचं नाणं 1200-1800 रुपयं आणि 20 ग्रॅम चांदीचं नाणं 2000 ते 3000 रुपयांपर्यंत आहेत. शहरानुसार या नाण्यांच्या किंमत थोडा फार फरक असेल.

VIEW ALL

Read Next Story