धार्मिक विषयांसंदर्भात लेखन करणारे प्रसिद्ध भारतीय लेखक अक्षत गुप्ता यांनी एका पॉडकास्टमध्ये 'भगवान' या शब्दाचा फुल फॉर्म सांगितला आहे.
अक्षत यांच्या सांगण्यानुसार 'भ' वरुन भूमि सूचित होतो.
'ग' वरुन गगन म्हणजेच आकाश अधोरेखित केलं जातं.
'व' वरुन वायू असा अर्थ होतो.
'व'ला असलेले मात्र म्हणजेच आ म्हणजे अग्नी सूचित करतो.
'न' म्हणजे नीर अर्थात पाणी.
अक्षत यांनी हा फुल फॉकर्म सांगताना, ज्या कोणत्या शक्तीला ही पाचही तत्व आपल्या ताब्यात ठेवण्याची कला ठाऊक असते त्याला भगवान म्हणतात.
'माझ्या मते तर तीनच देव म्हणजेच भगवान आहेत, ते म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश,' असं अक्षत यांनी सांगितलं.
डिस्क्लेमर - येथे देण्यात आलेली सर्व माहिती वैयक्तिक मतं तसेच धार्मिक आणि सामाजिक मान्यतांवर आधारित आहे. zee24tass.com याला दुजोरा देत नाही.